पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सतत भारताची तुलना पाकिस्ताशी का करतात? नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहात की, पाकिस्तानचे राजदूत असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी विचारला आहे. सुधारीत नागरीकत्व कायद्याविरोधात सिलिगुरीमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

आम्ही भारतावर प्रेम करतो. भारत हा मोठा देश आहे, आणि आपल्या देशाची संस्कृती महान आहे. या संस्कृतीचा वारसा आपल्याला लाभलेला आहे असं ममता बॅनर्जीं यांनी म्हटलं. ममता बॅनर्जी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही टीका केली. ऐकीकडे अमित शहा म्हणतात, की देशात एनआरसी लागू करु आणि दुसरीकडे पंतप्रधान म्हणतात, याविषयी कोणतीचं चर्चा झालेली नाही. आम्ही प.बंगालमध्ये एनपीआरला परवागी देणार नाही असंही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *