ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात गांधी शांतता यात्रेची सुरुवात झाली. CAA,NRS आणि NPR च्या विरोधात गांधी शांतता यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या गांधी शांतता मार्चमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचाही सहभाग होता.

शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर या दोन दिग्गज नेत्यांनी गांधी शांतता यात्रेला आपला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे समाजातील एक मोठा वर्ग नाराज आहे. आपल्या या समाजाला रस्ता दाखवण्याची गरज आहे. आपल्या महात्मा गांधींनी दाखवलेल्या सत्याग्रहाच्या विचारांनी पुढे गेलं पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

गांधी शांतता यात्रा ही मुंबई नंतर गुजरात, साबरमती आश्रम, पोरबंदर, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यातील प्रमुख शहरांमधून जाऊन 30 जानेवारीला दिल्लीतील महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळ राजघाट येथे यात्रेचा समारोप होणार आहे. मोदी सरकारने आणलेला हा कायदा देशाचे विभाजन करणारा आहे. मात्र, आम्ही पुन्हा देशाचे विभाजन होऊ देणार नाही. आम्ही गांधींची पुन्हा हत्या होऊ देणार नाही असं यशवंत सिन्हा यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *