सीएए या कायद्या विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा शांततेत मोर्चा निघाला. या मोर्चादरम्यान एका तरुणाने गोळीबार केला.  या तरुणाचा सत्कार होणार आहे. हिंदू महासभेचे प्रवक्त्ये म्हणतात की, मला या तरुणाचा अभिमान वाटतो. शरजील इमाम यांच्या सारखे देशद्रोही मुलं आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, शाहीन बागमधील देशद्रोही लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असं वादग्रस्त विधान हिंदूमहासभेचे प्रवक्ते अशोक पांडे यांनी केलं आहे. या गोळीबारामध्ये एक विद्यार्थी जखमी झाला आहे.

रामभक्त गोपाळ याच्या सत्कार करण्यासोबत त्याला या प्रकरणात लागणाला सर्व कायदेशीर खर्च हिंदू महासभा करणार असल्याचेही पांडे यांनी स्पष्ट केलं आहे. या माथेफिरु तरुणाला हिंदू महासभेने नथूराम गोडसे प्रमाणे एक सच्चा देशभक्त आहे असं म्हटलं आहे. रामभक्त गोपाळ असं या तरुणाचं नाव आहे. इतकंच नाही तर खून आणि देशाच्या भल्यासाठी केलेल्या कृत्यामध्ये फरक असतो. देशहितासाठी केलेल्या कृत्याला कायदा वेगळा असतो असं ही अशोक पांडे यांनी म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *