भाजप नेते आणि खासदार गिरीश बापट यांनी सत्तार यांच्या राजीनाम्यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याच्या आधीच नवरा पळाला अशी परिस्थिती महाविकास आघाडीत मध्ये उद्भवली आहे, असं खासदार गिरीष बापट यांनी म्हटलं आहे. तीन पायांच्या सरकारमध्ये काहीही होऊ शकतं. या सरकारमध्ये काय चलबिचल सुरू आहे हे यातून दिसून येतं, असं त्यांनी म्हटलंं आहे.

शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी खातेवाटपाआधीच राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सत्तारांच्या राजीनामा दिल्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातं असून, विरोधी पक्ष असलेला भाजपमधून प्रतिक्रिया येण्या सुरूवात झाली आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जैसी करणी वैसी भरणी, अशा शब्दांत सत्तार यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ही पहिली बातमी आहे. आज अशा अनेक बातम्या मिळतील, असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

 

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *