8 फेब्रुवारीला दिल्लीत विधानसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे.  तर11 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दिल्लीत एक कोटी 46 लाख मतदार आहेत. दिल्लीमध्ये 70 विधानसभा जागा असून गेल्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानं 67 जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला होता. दिल्लीची निवडणूक एकाच टप्पात होणार असून, या निवडणुकीकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

आपने गेल्या महिन्यात प्रचारालाही सुरुवात केली आहे. ‘अच्छे बीते 5 साल, लगे रहो केजरीवाल’ अशी प्रचारमोहीमेची लाइनही ठरलेली आहे.दिल्लीत आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजपा अशी तिहेरी लढत पहायला मिळणार आहे. दिल्लीत आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *