महाविकास आघाडीचं सरकार सहा महिन्यापर्यंत सत्तेतं राहिलं. तसंच विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेता देखील मिळणार नाही. पण फडणवीस यांचं म्हणणं खरं ठरलं नाही. फडणवीसांचे सर्वच अंदाज चुकत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आता चांगला ज्योतिष शोधावा आणि त्याचा सल्ला घ्यावा असं महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्याचं पालकमंत्रिपद का नाकार यावर आपली भूमिका स्पष्ट केली. मला पालकमंत्री पद नको कारण माझ्याकडे पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद आहे. त्याशिवाय काँग्रेस विधीमंडळ गटनेते पदही माझ्याकडे, त्यामुळे इतरांना संधी मिळावी यासाठी मी पालकमंत्री पद नाकारलं. त्यामुळं नगरच पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे मी नाराज असल्याची बातमी चुकीच्या आहेत असं त्यांनी स्पष्ट केले.महाविकास आघाडीचं सरकार विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे.  असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *