आपण एका गाडीत बसू शकलो नाही, पण एकाच स्टेशनवर आलो आहे असं म्हणतं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्धाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती होती.

मुख्यमंत्र्यांचं भाषण होण्यापूर्वी केंद्रीय नितीन गडकरी यांचं भाषण झालं. यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या निर्णयांचं कौतूक केलं. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारनं विकासकामांचे प्रस्ताव पाठवावेत, असं आवाहनही गडकरी यांनी केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या विकासाची कामं थांबणार नाहीत. त्याचबरोबर नागपूर ही उपराजधानी आहे, तीला मागे पडू देणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या जनतेला आश्वस्त केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *