अभिनेत्री दीपिका पदूकोण हीने जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात निषेध केला आहे. दीपिकाने जेएनयूच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. जेएनयूच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला तिनं पाठिंबा दिला आहे. मात्र यावरुन नव्या वादाला सुरुवात झाली आहे. भाजपचे दिल्लीतील प्रवक्ते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी दीपिकाच्या ‘छपाक’ या सिनेमावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. आता ट्विटरवरही #BoycottChhpaak चा ट्रेंड सुरू झाला आहे.

दीपिका आपला आगामी चित्रपट छपाकच्या प्रमोशनसाठी दिल्लीत होती. यावेळी ती जेएनयूमध्ये सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी झाली. दीपिका जेएनयूत दहा मिनिटं होती. तिने कोणतंही भाषण केलं नाही. मात्र नेटकऱ्यांनी दीपिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ट्विटरवर ‘छपाक’चा विरोध सुरू झाला आहे. काही तरुणांनी दीपिकाचं समर्थन करत तिचा सिनेमा पाहणार असल्याचं म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *