केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शाळांमध्ये भगवतगीता शिकवली पाहिजे. आपण मुलांना मिशनरी शाळांमध्ये पाठवतो. या मिशनरी शाळांमधून शिक्षण घेतल्यानंतर ही मुले परदेशात जातात, नंतर गोमांस खायला लागतात असं त्यांनी म्हटलं आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दररोज प्रार्थना आणि हनुमान चालिसा शिकवायला हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

गिरीराज सिंह हे एका कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये बोलतं होते. आपण मुलांना मिशनरींच्या शाळांमध्ये टाकतो. त्यानंतर ते आयआयटीमध्ये शिकतात, इंजिनिअर होतात. नोकरीसाठी परदेशात जातात आणि यांच्यापैकी बहुुतेक जण गोमांस खातात. कारण आपण त्यांना आपली संस्कृती शिकवत नाही, असं गिरीराज यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह हे बिहारच्या बेगूसरायचे खासदार आहेत. वादग्रस्त विधांनामुळे खासदार गिरीराज सिंह हे कायमच चर्चेत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *