दिल्ली विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. भाजपाच्या मोठ्या नेत्यांनी दिल्लीत प्रचाराची धुरा सांभाळली आहे.  राज्याचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे हे सुद्धा भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत.  महाराष्ट्रात १३०० सरकारी शाळा बंद करणारे  शिक्षण मंत्री विनोद तावडे हे दिल्लीत भाजपाचा प्रचार करणार आहेत. त्यांना दिल्लीतील शाळा दाखवा, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी  विनोद तावडे यांचे प्रचार करतानाचे फोटो ट्विट केली आहे.

 

केजरीवाल यांनी दिल्लीच्या लोकांना आव्हान केलं आहे. आपने खूप मेहनत घेऊन सरकारी शाळा चांगल्या केल्या आहेत. विनोद तावडे यांना आपल्या शाळा दाखवा, छोले भटूरे खाऊ घाला आणि दिल्ली दाखवा. ते आपले पाहुणे आहेत. ट्विटच्या माध्यातून केजरीवाल यांनी विनोद तावडे यांच्यावर टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *