मुंबईत येत्या २७ जानेवारीपासून ‘नाइट लाइफ’ सुरू होणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळानं या योजनेला मंजुरी दिली आहे. मुंबईतील हॉटेल्स, व दुकानं २४ तास सुरू राहणार आहेत. मात्र, पब आणि बार रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे.

मुंबईतील हॉटेल्स व दुकानं २४ तास सुरू राहणार असल्यामुळे रोजगार निर्मिती होईल. तसंच महसूल वाढवण्याबरोबर लोकांना २४ तास सेवा मिळेल. या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. या प्रयोगावर टीका करणाऱ्यांची मनं प्रदूषित आहेत, अशी टीका त्यांनी  केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी नाइट लाइफच्या निर्णयावर टीका करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना राज्य शासनाने काढलेला जीआर नीट वाचण्याचा सल्ला देखील दिला आहे. या निर्णयामुळे पोलिसांवर कोणताही ताण येणार नाही, असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *