लेखक मुज्तबा हुुसेन यांनी पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. आपल्या देशाची लोकशाही धोक्यात आली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर ही भाष्य केलं आहे. पहाटे सात वाजता शपथविधी पार पडला. रात्रीच्या अंधारात सरकार स्थापन केलं जात आहे. देशात सगळीकडे भीतीचं वातावरण आहे, त्यामुळे भारत सरकारतर्फे मिळालेला पुरस्कार परत देणार आहे, असं कवी मुजतबा हुसैन यांनी म्हटलं आहे. त्यांना २००७ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. पद्मश्री हा भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.

2015 देशातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात ‘पुरस्कार वापसी’ मोहिम सुरु झाली होती. वाढती असहिष्णुता, मॉब लिंचिंगसारख्या घटनांमुळे देशात भितीचे वातावरण तयार झाले आहे असं म्हणत 2015 अनेक लेखकांनी आपले पुरस्कार परत केले होते.

‘पुरस्कार वापसी’  या मोहिमेच्या माध्यमातून अशोक वाजपेयी, नयनतारा सेहगल, लेखिका अरुंधती रॉय, कुंदन शाह, सईद अख्तर मिर्झा यांचा समावेश होता. आता मुजतबा हुसैन यांनी देखील पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. त्यामुळे पुन्हा एकदा देशात ‘पुरस्कार वापसी’ मोहीम सुरु होण्याची चिन्हं आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *