उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपचा निलंबित आमदार कुलदीप सेंगर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने निर्णय दिला आहे. तसंच पीडितेला 25 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचेही आदेश दिले आहेत. १६ डिसेंबर रोजी कुलदीप सिंह सेंगरला न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. बलात्काराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर भाजपने सेंगरला पक्षातून निलंबित केले होते.

४ जून २०१७ रोजी एका मुलीला फसवून आमदार कुलदीप सेंगर आणि शशि यांनी तिच्यावर बलात्कार केला होता. तरुणी नोकरीसाठी भाजप आमदार कुलदीप सेंगरच्या घरी गेली असता तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. त्यावेळी पीडित युवती अल्पवयीन होती. २८ जुलै रोजी उन्नाव बलात्कार पीडित तरुणीच्या कारचा अपघात झाला होता. अपघातामध्ये ती गंभीर जखमी झाली.

या अपघातात पीडितेचे दोन नातेवाईक ठार झाले होते. या अपघातानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी या अपघातामागे सेंगरचा कट असल्याचा आरोप केला होता. ऑगस्टमध्ये सेंगर आणि शशी सिंहविरोधात गुन्हेगारी कट, अपहरण, बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत आरोप निश्चित करण्यात आले होते.

सर्वोच्च न्यायालयाने उन्नाव बलात्कार प्रकरणातील सर्व पाच प्रकरणे एक ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशमधील लखनऊतील न्यायालयातून दिल्लीतील न्यायालयात हस्तांतरित केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *