जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज निषेध केला आहे. नागरिकत्व कायद्याविरोधात जामिया मिलिया इस्लामियाचे विद्यार्थी आंदोलन करत होते. मात्र हे आंदोलन अचानक हिंसक झालं. देशात पुन्हा एकदा जालियनवाला बाग घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधलं आहे. भारत हा तरूणांचा देश असून त्यांची शक्ती एखाद्या बॉम्बची सारखी आहे. त्या बॉम्बची वात पेटवू नका असे खडेबोल उद्धव ठाकरे यांनी सरकारला लगावले आहेत.

हिवाळी अधिवेशनाचा दुसऱ्या दिवसाचं कामकाज तहकूब झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभेतील भाजप शिवसेना आमदारांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध नोंदवला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा मुद्दा आज विधानसभेत गाजला. भाजपचा काही सदस्यांनी तर सामनाचा प्रती सभागृहात आणल्या होत्या.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मी शेतकरयांना दिलेला शब्द पाळणारच आहे. आम्ही करायला लावलं असा आव कोणी आणू नये. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांसाठी २२०७ रुपयांची मागणी होती. केंद्राने अद्याप एक पैसाही दिला नाही. राज्याने केंद्राकडे साडेपंधरा हजार कोटींची मागणी केली आहे. भाजपचं सरकार केंद्रात आहे, त्यामुळे विधानसभेत शिमगा करण्यापेक्षा केंद्र सरकारकडे गळा मोकळा करावा असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *