महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळचा विस्तार झाला आहे. परंतू या महत्त्वाच्या सोहळ्याला शिवसेना खासदार संजय राऊत गैरहजर होते. संजय राऊत हे नाराज झाले आहेत, अशी चर्चा सुरु झाली आहे. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. सुनील राऊत हे नाराज असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. शिवसेना आमदार सुनील राऊत हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जात आहे.

महाविकास आघाडीचं सरकार आणण्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, शिवसेनेनं आमदार सुनील राऊत यांना संधी दिली नाही. त्यामुळं ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत २६ कॅबिनेट आणि १० राज्यमंत्री यांनी शपथ घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *