मी राहुुल सावरकर नाही, मी राहुुल गांधी आहे. मी माफी मागणार नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. यावर विधानावर शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो. तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे, अशा शब्दात राऊत यांनी राहुुल यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. संजय राऊत यांनी ट्वीट करत  सेनेची भूमिका मांडली आहे.

 

 

विर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे.
सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू ,गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा.इथे तडजोड नाहीत.
जय हिंद

— Sanjay Raut (@rautsanjay61) December 14, 2019

आज ‘भारत बचाव’ या रॅलीचे आयोजन काँग्रेसकडून करण्यात आलं होतं. या रॅलीत, मी राहुुल सावरकर नाही, मी राहुुल गांधी आहे. मी माफी मागणार नाही, उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनीच देशाची माफी मागावी, अशा शब्दांत राहुुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *