नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला साऱ्या देशभरातून विरोध होतं आहे. काही ठिकाणी आंदोलनाला हिसंक रुप आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत देशात शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं. या ट्विटला अभिनेत्री रेणुका यांनी उत्तर दिलं आहे. मोदी सर तुम्ही लोकांना सांगा की, तुमच्या सर्व आयटी सेल ट्विटर हँडलपासून दूर राहावे. बहुुतांश अफवा हेच पसरवतात. ते बंधुभाब, शांतता आणि एकतेच्या विरोधात आहेत. तुमचे आयटी सेलच खरंतर तुकडे-तुकडे गँग आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला देशातील सर्वच विद्यापीठातून जोरदार विरोध होतं आहे. जामियाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावर बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटीनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. रेणुका शहाणे यांनी भाजपाच्या आयटी सेलला तुकडे-तुकडे गँग म्हटलं आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील विविध मुद्दयांवर आपली मते मांडत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *