आरएसएसची चड्डी घालणाऱ्यांच्या हाती आसाम जाऊ देणार नाही. आसामचा कारभार नागपूरवरुन चालणार नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. गुवाहाटी येथे नागरिकत्व कायद्याविरुद्ध आयोजित सभेमध्ये राहुुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली आहे. या सभेमध्ये बोलताना त्यांनी आसामची संस्कृती आणि आसामी भाषेवर होण्यातीही प्रकारचे आक्रमण होऊ देणार नाही असंही त्यांनी  म्हटलं आहे.

भाजप सरकार लोकांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत. मोदीसरकारच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर देशभरात जी परिस्थिती निर्माण झाली होती, तशीच परिस्थिती सध्या देशात आहे. देशात सध्या जे काही सुरु आहे त्यामागे भाजप सरकारचा मोठा कट आहे. आसाममध्ये या कायद्याविरोधात तरुण रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. मात्र या आंदोलकांवर पोलीस गोळ्या चालवत आहेत. मोदी सरकार तरुणांचा आणि माता-भगिनींचा आवाज चिरडून टाकत आहेत. अशा शब्दात काँग्रेसचे नेता अध्यक्ष राहुुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *