राहुल गांधी यांनी झारखंडमध्ये प्रचारादरम्यान एका सभेत मेक इन इंडियाचे रेप इन इंडिया झाले आहे असं म्हटलं होतं. या वक्तव्यावर लोकसभेत आज गदारोळ माजला. यावेळी राहुल गांधी यांनी 2014चा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये ‘दिल्लीला ही बलात्काराची राजधानी आहे’ असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यामुळं राहुल गांधी यांनी माफी न मागण्याचा निर्णय घेताला आहे.