
झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती. मेक इन इंडियाचे रेप इन इंडिया झाले आहे, असं वक्तव्य राहुुल गांधींनी केलं आहे. या वक्तव्यवरुन संसदेत गदारोळ माजला. या वक्तव्यमुळे भारतीय महिलांचा अपमान झाला आहे. त्यामुळे राहुुल गांधी यांनी सर्व महिलांची माफी मागावी असं केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे
Union Minister Smriti Irani in Lok Sabha on Rahul Gandhi’s ‘rape in India’ remark: This is first time in history that a leader is giving a clarion call that Indian women should be raped. Is this Rahul Gandhi’s message to the people of the country? pic.twitter.com/BSTDlIoZ1h
— ANI (@ANI) December 13, 2019
केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत भाजपाच्या इतर महिला खासदारांनी संसदेत जोरदार घोषणाबाजी केली. राहुुल गांधी यांच्या वक्तव्यावरून राज्यसभेतही गदारोळ झाला आहे. स्मृती इराणीबरोबर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही राहुुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल यांचे विधान अतिशय मन दुखावणारे असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत म्हटलं आहे.
#WATCH Rahul Gandhi, Congress in Godda, Jharkhand: Narendra Modi had said ‘Make in India’ but nowadays wherever you look, it is ‘Rape in India’. In Uttar Pradesh Narendra Modi’s MLA raped a woman, then she met with an accident but Narendra Modi did not utter a word. (12.12.19) pic.twitter.com/WnXBz8BUBp
— ANI (@ANI) December 13, 2019
काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी देखील सभागृहात असंच विधान केलं होतं. मात्र, या वक्तव्यावरून झालेल्या गदारोळानंतर अधीर रंजन चौधरी यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.