पंकजा मुंडे यांचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांनी यावेळी पंकजा यांचा पराभव केला आहे. पंकजा मुंडेंनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर कार्यकर्त्यांना उद्देशून एक पोस्ट लिहीली आहे. ज्यात त्यांनी सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नवीन विचार करण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे. यासंबंधी मी १२ डिसेंबर रोजी सांगणार आहे, असं पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. यानंतर पंकजा मुंडेंनी ट्विटर अकाऊंटवरुन आपली भाजपसंदर्भातली ओळखही काढून टाकली आहे. पंकजा मुंडे लवकरच भाजपला रामराम करणार आहेत. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यावर संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना असं म्हटलं की, पंकजाच काय राज्यातील अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात आहे.

पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत – चंद्रकांत पाटील

पंकजा मुंडे या भाजपच्या महत्वाच्या नेत्या आहेत. छोट्या पातळीपासून काम करत त्या मंत्रीपदापर्यंत पोहचलेल्या आहेत. पंकजा मुंडे या काही पक्ष सोडणार नाही. या फक्त अफवा आहेत. असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *