हेरंब कुलकर्णी

मंत्रिमंडळ विस्तारात एकूण ४३ पैकी २२ मंत्री हे घराणेशाहीची पार्श्वभूमी असलेले आहेत.त्यात राष्ट्रवादीचे ९ कॉंग्रेसचे ८ आणि शिवसेना व पुरस्कृत ५ आहेत. एकूण ५० टक्के मंत्री हे घराणेशाहीतून आलेले आहे.१५ पैकी ९ म्हणजे राष्ट्रवादीचे ६० टक्के मंत्री घराणेशाहीचे तर कॉंग्रेस चेही ६० टक्के मंत्री घराणेशाहीचे आहेत.आमदारकीची तिकीटे यांनाच आणि निवडून आल्यावर मंत्रीही हेच होणार.महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व सर्व पक्षाचे प्रमुख नेते हेच घराणेशाहीतून आल्यामुळे या विषयावर कोणताच पक्ष बोलणार नाही.

1) उद्धव ठाकरे- वडील बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख होते
2) अजित पवार – काका शरद पवार माजी केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री होते
3) जयंत पाटील- वडील राजारामबापू पाटील मंत्री होते
4) बाळासाहेब थोरात- वडील भाऊसाहेब थोरात आमदार व सहकारात होते
5) दिलीप वळसे पाटील – वडील दत्तात्रय वळसे हे आमदार होते
6) बाळासाहेब पाटील – वडील पी डी पाटील हे आमदार होते
7) राजेंद्र शिंगणे- वडील भास्करराव शिंगणे आमदार होते
8) धनंजय मुंढे – माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंढे यांचे पुतणे
9) राजेश टोपे- वडील अंकुशराव टोपे खासदार होते
10) प्राजक्त तनपुरे- जयंत पाटील यांचा भाचा व माजी आमदार प्रसाद तनपुरे यांचा मुलगा.
11) आदिती ठाकरे- वडील सुनिल तटकरे मंत्री होते
12) अशोक चव्हाण- वडील शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते
13) अमित देशमुख -वडील विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते
14) सुनील केदार – वडील बाबासाहेब केदार मंत्री होते
15) यशोमती ठाकूर – वडील भैय्यासाहेब ठाकूर आमदार होते
16) वर्षा गायकवाड- वडील एकनाथ गायकवाड खासदार
17) बंटी पाटील- वडील डी वाय पाटील मंत्री व राज्यपाल
18) विश्वजित कदम – वडील पतंगराव कदम मंत्री होते
19) आदित्य ठाकरे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा
20) शंभूराजे देसाई -माजी मंत्री बाळासाहेब देसाई यांचे नातू
21) शंकरराव गडाख (अपक्ष ) माजी खासदार यशवंतराव गडाख यांचा मुलगा
22) राजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष) वडील सूतगिरणी चेअरमन होते

हा विषय काढला की नेहमी हे मंत्री नेते अतिशय कार्यक्षम आहेत असे सांगितले जाते पण त्या पक्षात ज्यांना घराणेशाही पार्श्वभूमी नाही ते मंत्री झाले असते तर त्यांच्यात अधिक क्षमता असत्या पण संधीच मिळत नाही. आदित्य ठाकरे आदिती ठाकरे यांना कोणताच अनुभव नसताना केवळ घराणेशाही हेच त्यांचे क्वालिफिकेशन ठरते.

विधानसभा निवडणुकीत मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या घराणेशाहीचा मी अभ्यास केला होता. त्यात ११६ मतदारसंघात ९४ उमेदवार हे घराणेशाहीतून आलेले होते तर १९९ साखर कारख्नान्यात ९९ चेअरमन हे घराणेशाहीतून आलेले होते. इतकी ही घराणेशाही खोलवर रुजली आहे. हा अहवाल pdf स्वरूपात ज्यांना वाचायचा असेल तर ८२०८५८९१९५ वर मेसेज पाठवावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *