2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. आज गुजरात विधानसभेत नानावटी-मेहता आयोगाचा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात असं नमूद करण्यात आलं की, गुजरातमधील दंगल पूर्वनियोजित नव्हती. मात्र या अहवालात श्रीकुमार, राहुल शर्मा, संजीव भट्ट यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.

गुजरातमध्ये झालेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी नानावटी – मेहता आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आज या आयोगाने  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन गुजरात सरकारला  क्लीन चिट दिली आहे. या अहवालाचा पहिला भाग सप्टेंबर २००९ रोजी सादर करण्यात आला होता. त्यानंतर १८ नोव्हेंबर २०१४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्याकडे अंतिम अहवाल सादर करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *