नागरिकत्व सुधारणा कायद्याला संपूर्ण भारतात विरोध होतं आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा चांगला गाजत आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या कायद्याच्या संदर्भात महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. मी ज्या वंजारा समाजातून येतो, त्यातील बहुुतांश लोकं मजुरीची कामे करतात. अनेक महिलांना शेतातच मुलं होतात. त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्र नसतात. त्यांनी काय करायचं? हा कायदा माझ्या जातीविरोधात आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यापक्षांनी हा कायदा मुस्लिमविरोधी आहे असं म्हटलं आहे. राज्यात शांती हवी असेल तर हा कायदा राज्यात लागू करु नका अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे. 15राजकीय पक्षांनी काल या कायद्याविरोधात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती.

नागरिकत्व  सुधारणा कायद्याला देशभरातील विविध शहरात  तीव्र विरोध होत आहे. या कायद्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. कोर्टात ५९ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *