महाविकास आघाडीचं सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होतं आहे. मात्र पहिल्याच दिवसापासून विरोधकांनी सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाच निषेध म्हणून, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाच्या आमदारांनी ‘मी पण सावरकर’असं वाक्य लिहिलेली भगवी टोपी घालून विधीमंडळ परिसरात प्रवेश केला. तसंच राहुुल गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हे अधिवेशन आठवडाभर चालणार आहे.

भाजप राज्यभर ‘मी सावरकर, आम्ही सगळे सावरकर’ या कँपेनला सुरुवात केली आहे. खासदार संजय राऊत यांनी सावरकरांच्या मुद्यांवर कोणत्याच तडजोड नाही, असं काँग्रेसला सुनावलं होतं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राहुुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नखाचीही सर राहुुल गांधी यांना नाही आणि त्यांनी स्वतःला गांधी समजण्याची घोडचूक अजिबात करू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *