नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झाले असून, आज या विधेयकासाठी राज्यसभेत मतदान होणार आहे.  मात्र या विधेयकाच्या विरोधात देशातील ७२७ प्रसिद्ध व्यक्तींनी पत्र लिहिलं आहे. माजी न्यायाधीश, लेखक, अभिनेते, सामाजिक कार्यकर्त्यांनी हे पत्र लिहिलं आहे. यात जावेद अख्तर, अभिनेते नसीरुद्दीन शहा, इतिहासकार रोमिला थापर, दिल्ली हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश एपी शाह, अपर्णा सेन, अभिनेत्री नंदिता दास, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव, अरुणा राय या व्यक्तींचा समावेश आहे.

आम्ही हे विधेयक सांस्कृतिक आणि शैक्षाणिक समुदायांचे विभाजनशील, भेदभाव करणारे तसंच  हे विधेयक असंवैधानिक असल्याचे मानतो. या विधेयकामुळे भारताच्या लोकशाहीला नुकसान पोहोचलं असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे संविधानाला धोका निर्माण होईल. यामुळे आम्ही सरकारला हे विधेयक मागे घेण्याची विनंती करतो, असं या पत्रात म्हटलं आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून आलेल्या बिगरमुस्लीम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद या दुरूस्ती विधेयकात आहे. हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *