लोकसभेमध्ये काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी भारताचा प्रवास मेक इन इंडियाकडून रेप इन इंडिया असं वक्तव्य केलं आहे.  देशातील महिला सुरक्षेच्या मुद्यावरून ते लोकसभेत बोलतं होते. त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. मात्र त्यांच्या या विधानामुळे ते वादात सापडण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक विषयांवर बोलतात. सगळ्या विषयांवर आपल्या प्रतिक्रिया देतात. मात्र महिलांच्या सुरक्षेच्या मुद्यावर त्यांनी अजुनही प्रतिक्रीया दिली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सुरक्षेच्या मुद्यावर संसदेत सविस्तर बोललं पाहिजे.

हैदराबाद सामूहिक बलात्कार घटनेनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. आज लोकसभेतही याचे पडसाद उमटले आहेत. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भारतात रोज १०६ बलात्काराच्या घटना घडतात. यामध्ये दहापैकी चार तरुणी अल्पवयीन असतात. चार घटनांमध्ये केवळ एका घटनेतील गुन्हेगाराला शिक्षा मिळते, अशी स्थिती आहे. हे आपल्या देशासाठी लज्जास्पद आहे. असं चौधरी यांनी लोकसभेत म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *