काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाला शिवसेनेनं बळी न पडता राज्यात नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी करावी असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. राज्यातील सरकार वाचवण्यासाठी भाजपा शिवसेनेसोबत राजकीय तडजोडीसाठी तयार आहे, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.शिवसेनेनं आपला मूळ बाणा दाखववा. कोणाच्याही दबावाला बळी पडू नये असं मत आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केलं आहे. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत आणि राजयसभेत मंजुर झाले आहे. या विधेयकला शिवसेनेनं लोकसभेमध्ये समर्थन दिलं होतं. परंतू राज्यसभेतून काढता पाय घेतला होता.  हा कायदा राज्यात लागू होणार की नाही, यावरून संभ्रम आहे.

त्यामुळे शिवसेनेनं देशहिताकडं लक्ष द्यावे. घुसखोरांना घालवण्यासाठी सरकारने हे विधयेक आणलं आहे. त्यामुळे शिवसेने योग्य भूमिका घ्यावी असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *