मुंबई मेट्रोच्या विद्यमान आयुक्त अश्विनी भिडे यांना मेट्रो आयुक्त पदी कायम ठेवून, त्यांची प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे. अश्विनी भिडे या बुधवारी आपल्या नव्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अश्विनी भिडे यांची बदली होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, राज्य सरकारने अश्विनी भिडे यांना प्रधान सचिवपदी बढती दिली. त्याशिवाय त्यांच्याकडे मेट्रोची जबाबदारी कायम असणार आहे.

आरेतील कारशेडच्या बांधकामावरून अश्विनी भिडे यांच्यात आणि पर्यावरणप्रेमी मध्ये वाद झाला होता. मेट्रोच्या कारशेडच्या बांधकामासाठी रात्रीच्या वेळी झाडे तोडण्यात आली होती. त्यावेळी पर्यावरणप्रेमींनी रात्रीच्या वेळेस आरेत मोठं आंदोलन सुरू केलं होतं. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. शिवसेनेनं अश्विनी भिडे यांच्यावर टीका केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *