विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून 11 दिवस झाले आहेत.  राज्यात अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही. संजय राऊत यांनी ‘सामना’या वृत्तपत्रतून भाजपावर टीक करण्याची एकही संधी सोडत नाही. केवळ समान नाहीतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदांच्या माध्यमातून भाजपावर टीका करताना दिसत आहेत. मात्र आता ‘नागपूर तरुण भारत’या वृत्तपत्राच्या अग्रलेखामधून राऊत यांच्यावर टीका करण्यात आली आहे. तरुण भारतच्या अग्रलेखात संजय राऊत यांना ‘बेताल’ आणि ‘विदूषक’ असं संबोधण्यात आलं आहे. महाराष्ट्र शिवसेनेला कधीच माफ करणार नाही. शिवसेनेच्या भूमिका ही चूकीची आहे असं या अग्रलेखामध्ये म्हटलं आहे. तसंच राऊत यांच्यामुळे महायुतीचे सरकार स्थापन होतं नाही असं या अग्रलेखातमध्ये म्हटलं आहे. एका ‘बेताला’च्या मागे संपूर्ण शिवसेना फरफटत जात असेल तर त्याहून दुसरे दुर्दैव कोणते म्हणता येईल? अशी जहरी टीका या अग्रलेखातून राऊत यांच्यावर करण्यात आली आहे.

अशा जहरी टीकेमुऴे सेना-भाजपमधला वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. ‘उद्धव आणि बेताल’ असं शीर्षक असेल्या लेखातून संजय राऊतांवर टीका करण्यात आली आहे. या टीकेवर संजय राऊत म्हणतात की, ‘तरुण भारत’ अशा प्रकारचे एखादे वृत्तपत्र आहे का? मला माहीत नाही.  खासदार संजय राऊत हे आज राज्यापालांची सदिच्छा भेट घेणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *