अभिनेते अजय देवगण यांनी निर्माण केलेला आणि त्यांची महत्वाची भूमिका असणारा नरवीर तानाजी यांच्यावरील ”तान्हाजी” हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादग्रस्त ठरण्याची चिन्हे असून संभाजी ब्रिगेडने त्यावर गंभीर आक्षेप घेतले आहेत.

येत्या 10 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत असून, या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर प्रसिद्ध झाल्यावर या चित्रपटावर आक्षेप घेण्यात आले आहेत.या चित्रपटात छञपती शिवाजी महाराजांना हाताखालील लाकूड फेकून मारणारा व्यक्ती कोण दाखवला आहे? चिञपटाद्वारे रामदासाचे उदात्तीकरण केले गेले असेल तर चिञपटाचे निर्माते-दिर्ग्दशक यांना याचा जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष अमरजीत पाटील यांनी म्हटलं आहे.

अभिनेञी काजोल यांच्या तोंडी जे संवाद आहेत. त्यावरुन छञपती शिवरायांची अनऐतिहासिक अशी गो-ब्राम्हणप्रतिपालक ही उपाधी परत जनमानसावर ठसवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. हे सरळ सरळ इतिहासाचे विकृतीकरण आहे. छञपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या भगव्या झेंड्यावर ॐ दाखवून,छञपती शिवरायांची सर्वधर्म समावेशक प्रतिमा पुसून छञपतींचे हिंदुपतपादशाह अशी धार्मिक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.

या चिञपटातील अन्य आक्षेपार्ह दृष्याबाबत आम्ही संभाजी ब्रिगेडच्यावतीने तातडीने सदर चिञपटाचे निर्माते व दिर्ग्दशक यांचा खुलासा मागवत आहे. ऐतिहासिक विषयावर चिञपट जरुर निघाले पाहिजेत. परंतु, त्याद्वारे ऐतिहासिक प्रसंगाचे वा व्यक्तींचे ब्राम्हणीकरण,विकृतीकरण कुठल्याही परिस्थितीमध्ये खपवून घेतले जाणार नाही. याची संबंधितांनी नोंद घ्यावी. असा इशारा संभाजी ब्रिगेडच्यावतीने  देण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *