भाजप आणि शिवसेनेतील सत्ता संघर्षावर आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केलं आहे. आपसात भांडून दोघांचही नुकसान होतं. मात्र कोणी हा वाद मिटवण्यास तयार नाही. स्वार्थामुळे नुकसान होतं मात्र स्वार्थ सोडायला कोणी तयार नसतं. हे तत्व सर्वांना लागू आहे. मग तो व्यक्ती असो किंवा देश असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. नागपूरात एका कार्यक्रमात त्यांनी दोन्ही पक्षांना सल्ला दिला आहे.

भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षात मुख्यमंत्रीपद आणि सत्तेतील समान वाटा या मुद्यांवरून एकमत न झाल्याने राज्यात युतीला सत्तास्थापन करण्यात यश आलं नाही. त्यामुळे सध्या राज्यात राष्ट्रपती शासन लागू आहे. भाजप आणि शिवसेनेकडून मात्र एकमेकांच्या विरोधात आरोप आणि विधाने येत राहिली आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील युती  तुटली आहे. सध्या राज्यातील सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या नेत्याच्या भेटीगाठी होऊ लागल्या आहे. आता राज्यात नव्या राजकीय समीकरणाची चर्चा जोरदार रंगलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *