राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी लागले. यामध्ये किंगमेकर ठरलेला शिवसेना पक्ष भाजप सोबत जाऊन उपमुख्यमंत्री पद घेणार की इतर पक्षांसोबत युती करून मुख्यमंत्री पद घेणार या चर्चांना कालपासून उधाण आलं होतं. यावर छगन भुजबळांनी देखील सेनेला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. दरम्यान, या चर्चांना शरद पवारांनी पूर्णविराम लावला आहे.

आम्ही एकत्र राहून विरोधी पक्षात बसू, पण शिवसेनेसोबत जाणार नाही, असं बोलून शरद पवारांनी सेना-राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चेतील हवाच काढून टाकली. त्यांच्यासोबत जाण्याचा काही संबंध नसून काँग्रेस आणि राष्ट्रवादी कायम एकत्र राहणार आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्याकडून जनतेचे प्रश्न सोडवू. आम्ही एकत्र राहून महाराष्ट्राचे प्रश्न मांडू, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी म्हटलं आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *