परळी मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेसाठी जाहिरातबाजी करण्यात आली. पण, या जाहिरातींमधून भाजपला तळागाळात पोहोचवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांचा फोटो वगळण्यात आल्याचं दिसून आलं. दरम्यान, ही बाब निदर्शनास आणून देत, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी माझ्या जीवनातील हा सर्वात वाईट दिवस होता, असं म्हटलं आहे.

राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या परळी मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा पार पडली. दरम्यान, या सभेची वातावरण निर्मितीसह पंकजा मुंडे यांनी मोदींसमोर शक्तीप्रदर्शन केलं. यासाठी सभेची जाहिरातबाजी देखील करण्यात आली होती. पण, या जाहिरातींमधून भाजपला महाराष्ट्रात जिवंत ठेवणारे गोपीनाथ मुंडे यांचा फोटो वगळण्यात आल्याचं दिसून आलं. दरम्यान, ही बाब निदर्शनास आणून देत, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी खेद व्यक्त केला.

भाजपच्या या कृत्याला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी लक्ष्य केलं आहे. दिवंगत लोकनेत्यांचा अपमान कसा करायचा हे भाजपला चांगलंच जमतं, असा टोला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी बीड येथील सभेमध्ये भाजपवर लगावला. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेच्या आधी गोपीनाथ गडाकडेही पाठ फिरवली.

यावेळी विधानसभेची निवडणूक ही इमानदारी विरुद्ध बेईमानीची आहे. आदरणीय पवार साहेब तसंच सर्व कार्यकर्ते यांच्या संगनमताने नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली होती. मात्र उमेदवारी दिल्यानंतरही त्यांनी पक्षांतर केलं. यालाच म्हणतात बेईमानी. तुम्ही या बेईमानीला केजच्या मातीत गाडा, असं भावनिक आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *