कर्जत-जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी ‘सामना’ या वृत्तपत्रातील अग्रलेखातून मांडलेल्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. ही शिवरायांचीच प्रेरणा! उतू नका असं शीर्षक असलेल्या सामनाच्या अग्रलेखात भाजपावर टीका  करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी स्वतःला महाराष्ट्रातील तेल लावलेला शक्तिशाली पहेलवान म्हणून घोषित केलं. पण मोठ्या मनाने मान्य केले पाहिजे की ते ‘तेल’थोडे कमी पडले व मातीतल्या कुस्तीतले वस्ताद म्हणून शरद पवार यांनी ‘गदा’ जिंकली आहे. या शब्दात अग्रलेखातमध्ये शरद पवार यांचे कौतुक केलं आहे. यावर रोहित पवार यांनी म्हटलं, एक चांगली गोष्ट सामनाच्या माध्यामातून मागील काही महिन्यांपासून दिसत आहे, ती म्हणजे ते चांगल्या गोष्टीला चांगलचं म्हणतात आणि वाईट गोष्टीला ते वाईटच म्हणतात. त्यांनी केलेल्या कौतुकाचं आम्ही स्वागतच करतो.

ही शिवरायांचीच प्रेरणा! उतू नका मातू नका… या शीर्षकातून भाजपाच्या राजकारणावर सामना वृत्तपत्रातील अग्रलेखातून जोरदार टीका केली आहे. फार शहाणपणा करु नका. उतू नका, माजू नका. सत्तेचा माज दाखवला तर याद राखा! असा जनादेश राज्याच्या जनतेने दिला आहे. या शब्दात सामनाच्या अग्रलेखातून सध्याच्या राजकारणावर भाष्य केलेलं आहे. सामनाच्या लेखातून उदयनराजे भोसले यांच्यावर भाष्य केले. शरद पवार यांच्या नेतृत्वाचाही पुन्हा कस लागला. एका जिद्दीने ते लढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *