नोबेल पुरस्कार विजेत्याने त्यांचं काम प्रामाणिकपणे केलंय. भाजप नेत्यांना जे काम मिळालय ते सोडून ते दुसऱ्यांचं योगदान नाकारण्याचं काम करत आहेत. अर्थव्यवस्था कोलमडत चालली आहे. अर्थव्यवस्था म्हणजे कॉमेडी सर्कस नाही. असं म्हणत प्रियांका गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे.

भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी चिंता व्यक्त केली होती. भारतीय अर्थव्यवस्था ही पूर्णपणे डळमळीत झाली आहे, असं त्यांनी म्हटलं होत. यावर पीयूष गोयल यांनी नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्यावर टीका केली होती. अभिजीत बॅनर्जी हे डाव्या विचारसरणीकडे झुकलेले आहेत. या टीकेला काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *