मुंबईतील बीकेसीमध्ये शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत युतीची जाहीर सभा पार पडली. यावेळी सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू होताच कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकच उरले नसल्याचं म्हटलं. यासह ईडीचा वापर, सुशीलकुमार शिंदेंचं काँग्रेस-राष्ट्रवादी थकल्याचं वक्तव्य अशा मुद्द्यांवर देखील त्यांनी टीका केली. पण हे सर्व घडत असताना सभेला आलेले कार्यकर्ते, मतदारांचा वेगळाच विचार होता. मोदींचं भाषण सुरू होताच भर सभेतून मोदींच्या समोरून एक्झिट घेतली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *