राज्यातील विधानसभा निवडणूक जवळ आली तसं प्रत्येक राजकिय पक्षांनी आपापले जाहीरनामे घोषित केले आहेत. दरम्यान, आता भाजपने संकल्पपत्र सादर केलं आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी हल्ला चढवला आहे. भाजपचे संकल्पपत्र म्हणजे निव्वळ गाजरांचा पाऊस आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. ठाण्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आल्या असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी संकल्पपत्रातील सावरकर आणि फुले दाम्पत्यांना भारतरत्न देण्यावरून लक्ष्य केलं आहे. भाजपचं ५ वर्ष सरकार होतं ना आता… मग त्यांनी सावरकरांना आणि फुले दाम्पत्यांना भारतरत्न का नाही दिला? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. मुळात भाजपला फक्त निवडणूक आली की भारतरत्न आठवतो. फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळावा, अशी गेली अनेक वर्षापासूनची आमची मागणी आहे, असं सुळे यांनी सांगितलं.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील भाजपच्या संकल्पपत्रावर हल्ला चढवला आहे. भाजपने आताच्या संकल्पपत्रात केलेल्या घोषणा २०१४ च्या जाहीरनाम्यात देखील केल्या होत्या. मग त्यांनी ५ वर्ष काय झोपा काढल्या का? अशी टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *