देशात होणाऱ्या मॅाब लिंचिंगच्या घटनांशी संघाचे नाव जोडले जाते पण संघाचा मॅाब लिंचिंगशी काहीही संबंध नाही. तसंच लिंचिंग हा शब्द भारतातला नाही तर परदेशी शब्द आहे. मॅाब लिंचिंग सारख्या घटनांमुळे आपल्या देशाला आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. आपल्या देशात इतकी विविधता असूनही लोक भारतात शांततेत राहतात. असं केवळ भारतात होऊ शकतं असं भागवत यांनी म्हटलं आहे. संघाच्या विजयादशमी उत्सवात भागवत यांनी विविध घटनांचा उल्लेख केला आहे.

संघाच्या विजयादशमी उत्सवात त्यांनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक मुद्दयांवर भाष्य केलं. सरकारने कलम ३७० रद्द करण्याच्या मोठा निर्णय घेतला. हा धाडसी निर्णय घेण्याची क्षमता केवळ मोदी सरकारकडे आहे. भागवत यांनी यावेळी पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं कौतुक केलं. चांद्रयान मोहिमेबद्दलही त्यांनी सर्वांचं कौतुक केलं आहे.

देशावरील आर्थिक मंदीच संकट दूर करण्यासाठी मोदी सरकार चांगली कामे करत आहे. देशातील आर्थिक मंदीवर सारख्या चर्चा करणे चूकीचे आहे. संपूर्ण जगावर मंदीते संकट आहे. या मंदीचा परिणाम भारतात ही दिसून येत आहे. असं भागवत यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *