प्रकाशझोतातील कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा कर्णधार विराट कोहली तयार असल्याचं बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितलं आहे. त्यामुळे भारत लवकरच भारत प्रकाशझोतातील कसोटी सामने खेळणार असल्याचे संकेत गांगुलीने दिले आहेत.

प्रकाशझोतामधील कसोटी सामने खेळण्यास कोहली तयार नसल्याची चर्चा होत होती. परंतु यात तथ्य नाही. खरतर कसोटी क्रिकेटला पुढे जाण्यासाठी ते आवश्यक आहे. यावर आमचं एकमत झालं आहे, असं बीसीसीआय’च्या मुख्यालयात कोहलीशी झालेल्या बैठकीनंतर गांगुलीने सांगितलं.

दरम्यान, ईडन गार्डन्स स्टेडियमवर बंगाल क्रिकेट संघटनेकडून गांगुलीचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर गांगुलीने, ”मी दिवस-रात्र स्वरूपाच्या कसोटी सामन्याचा समर्थक आहे. मात्र, हे प्रत्यक्षात केव्हा होईल, हे मला माहीत नाही. पण मी जोवर या पदावर आहे तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करीन, म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *