सध्या सणासुदीच्या हंगामात कपड्यांच्या खरेदी विक्रीला वेग आला आहे. मात्र असं असताना अंतरवस्त्रांच्या मागणीत घट झालेली पाहायला मिळतेय. यामध्ये महिला, पुरुष, मुलं आदी सर्वांचा समावेश आहे. तर रूप, लक्स, डॉलर आदी नामांकित ब्रँड्सलाही या मंदीचा फटका बसलेला दिसत आहे.

दरवर्षी सणासुदीच्या या दिवसांत खरेदीला वेग येतो मात्र यंदा ही खरेदी मंदावली असल्याचं सदर ब्रँड्सकडून सांगण्यात आलं आहे. याचं मुख्य कारण उत्पादक आणि उद्योग तज्ज्ञांनी सांगितलं आहे. ते म्हणतात, किरकोळ आणि स्थानिक विक्रेत्यांना जीएसटी आणि नोटबंदीचा फटका बसला आहे. त्यामुळे कंपनीतून येणारा माल ते अधिक स्टॉक म्हणून विकत घेत  नाहीत. परिणामी याचा विक्रीवर आणि उत्पादकांच्या भांडवलावर परिणाम होतो.

एडिलविस सिक्युरिटीज या रिसर्च फर्मनुसार भारतभरात १ लाख मल्टि ब्रँड आऊटलेट आहेत. यांपैकी ६० टक्क्यांहून अधिक विक्री ही मल्टि ब्रँड आऊटलेटकडून होते. तर उर्वरित विक्री ही ऑनलाइन व मॉल्सच्या माध्यमातून होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *