
देशातील मॅाब लिंचिंगच्या वाढत्या घटनांविरोधात बॉलिवूडसह अन्य क्षेत्रातील जवळपास 50 जणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलं होतं. मात्र या 50 सेलिब्रेटिंविरोधात बिहारच्या मुझ्झफरपूर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतिहासकार रामचंद्र गुहा, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम, श्याम बेनेगल, अनुराग कश्यप, अभिनेत्री अपर्णा सेन यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे.
या सेलिब्रेटिंविरोधात वकील सुधीरकुमार ओझा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या सेलिब्रेटिंनी देशाची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा खराब केली आहे, असं ओझा यांनी म्हटलं आहे. या गुन्ह्यात देशद्रोह, सार्वजनिक ठिकाणी चुकीची माहिती पसरवणं, धार्मिक भावना दुखावणं तसंच शांतता भंग करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असंही सुधीर ओझा यांनी सांगितलं आहे.
जुलै महिन्यात देशातील बॅालिवूडसह अन्य क्षेत्रातील 50 लोकांनी देशात ज्या प्रकारे मॅाब लिंचिंगच्या घटना वाढत आहेत. लोकांवर ‘जय श्रीराम’ बोलण्याची जबदस्ती केली जात आहे. याविरोधात पंतप्रधान यांनी कठोर पावले उचलावी असं आवाहन पत्रामध्ये केलं होतं.