भाजपने जो कोणी उमेदवार निवडला असेल मग तो चोर असो किंवा डाकू, आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, असं वादग्रस्त विधान भाजप झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलं आहे. आपण आपल्या केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे.  त्यांनी केलेली निवड ही योग्यच असणार आहे. या वादग्रस्त विधानावरून भाजपवर आता चौफेर टीका होत आहे.

काय म्हणाले निशिकांत दुबे?

ज्या कुणाला भारतीय जनता पक्ष उमेदवारी देईल मग तो विकलांग असो, चोर असो, डाकू असो किंवा बदमाश. मात्र, काहीही झालं तरी आपण त्या उमेदवाराला पाठिंबा दिला पाहिजे. आपले केंद्रीय नेतृत्व अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रघुवीर दास हे जी काही निवड करतील ती योग्यच असेल, असं झारखंडमध्ये पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना निशिकांत दुबे म्हणाले. दरम्यान, त्यांचं हे विधान कॅमेऱ्यात कैद झालं असून त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये वाऱ्यासारखा पसरला आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *