केंद्र सरकार भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचं लवकरच खासगीकरण करणार आहे. केंद्र सरकार बीपीसीएलमधील आपली ५३ टक्के भागीदारी विकण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, खासगीकरणाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकार यासाठी निविदा काढणार आहे. त्यानंतर विक्रीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

बीपीसीएलचे सध्याचं भागभांडवल १.११ लाख कोटी रुपये आहे. केंद्र सरकारचा बीपीसीएलमधील आपली सर्व भागीदारी विकून ६५ हजार कोटी रुपये उभारण्याचा मानस आहे. केंद्र सरकारच्या गुंतवणूकविषयक सचिवांच्या समितीने बीपीसीएल मधील सर्व हिस्सेदारी विकून टाकावी, अशी शिफारस केंद्र सरकारकडे केली होती.

मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड भारत पेट्रोलियमची भागीदारी घेण्यासाठी बोली लावणार असल्याची शक्यता, जपानी स्टॉकब्रोकर नोमुरा रिसर्चच्या अहवालाने वर्तवली आहे. यासह पवन हंस या हेलिकॉप्टर कंपनीलाही बीपीसीएलची भागीदार विकण्याचा मानस आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *