भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना भारतरत्न देण्याचं आश्वासन दिलं आहे. यावर असुदुद्दीन ओवैसी यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेलाही भारतरत्न द्या. इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी व्यक्तीला भारतरत्न देण्याचा विचार कसा करु शकतो. जर तुम्ही सावरकरांना भारतरत्न देत असाल तर मग नथुराम गोडसेलाही भारतरत्न द्या असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.

भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात सावरकरांना भारतरत्न देण्याचं आश्वासन दिलं आहे. यावर एमआयएम अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असुदुद्दीन ओवैसी यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहे.

याच दरम्यान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही काँग्रेस सावरकरविरोधी नाही असं वक्तव्य केलं आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या वेळी सावरकारांना भारतरत्न देण्याचा मुद्दा जोर धरताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *