
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड झाली आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीवर ब्राम्हण महासंघ आणि विश्व हिंदू परिषदेने प्रश्न उपस्थित केले आहेत. या विरोधामुळे ९३व्या मराठी साहित्य संमेलन पुन्हा चर्चेत आलं आहे.
फादर दिब्रेटो यांनी केवळ ख्रिस्ती धर्मा विषयी पुस्तकं लिहिलेली आहेत. तसंच फ्रादर दिब्रेटो हे केवळ ख्रिस्ती धर्माचे गोडवे गातात. हिंदू धर्म कसा चूकीचा आहे असा प्रचार फादर दिब्रेटो यांनी केला आहे असा आरोप ब्राम्हण महासंघाचे अनिल दवे यांनी केला आहे. फादर दिब्रेटो यांच्या निवडीवर विश्व हिंदू परिषदेचे पुणे जिल्हामंत्री नितीन वाटकर यांनी देखील विरोध केला आहे. मराठी साहित्य संमेलनासाठी तर काळा दिवस आहे. दिब्रेटो यांनी अनेक धर्मातरण केली आहेत. दिब्रेटो हे पांढरा रंगाचा झगा घालू संपूर्ण भारतात फिरतात. त्यांच्या भाषणात केवळ ख्रिस्त सेवेचा प्रचार करतात त्यामुळेच आमचा दिब्रेटो यांना विरोध आहे.