उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणूकांपूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पक्षातील राजकारणाला कंटाळून पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचं समोर आलं आहे.

लोकसभा निवडणुकांपूर्वी उर्मिला यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्या उपस्थितीत उर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. प्रवेश करताना मी निवडणूकीसाठी काँग्रेसमध्ये आली नसून निवडणूकीनंतरही काँग्रेस सोबतच राहणार असल्याचं म्हटलं होतं. बॉलिवूड काढून अनेक कलाकार राजकारणात येतात. परंतु तुम्ही माझ्या काँग्रेस प्रवेशाकडे त्या दृष्टिकोनातून पाहू नका. मात्र, त्यांनी आज तडकाफडकी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

उर्मिला यांनी पत्रात काय म्हटलंय?

काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनाम्यामागची कारणं स्पष्ट करणारं पत्रक उर्मिला यांनी प्रसिद्ध केलं आहे.

“मुंबई काँग्रेसचे तत्कालिन अध्यक्ष मिलिंद देवरा यांना मी १६ मे रोजी एक पत्र लिहिलं होतं. त्यासंदर्भात सातत्यानं पाठपुरावा करून कोणतीही कारवाई न झाल्यानंतर माझ्या मनात पहिल्यांदा राजीनाम्याचा विचार आला. त्यानंतर अत्यंत गोपनीय असा मजकूर असलेलं हे पत्र माध्यमांपर्यंत पोहोचल्यानं माझी प्रचंड निराशा झाली. माझ्या दृष्टीनं ही कृती म्हणजे विश्वासघात होता,” असं उर्मिला यांनी आपल्या राजीनाम्यामागची भूमिका स्पष्ट करणाऱ्या पत्रात लिहिलं आहे.

“माझं पत्र माध्यमांमध्ये फुटल्यानंतर मी तीव्र नाराजी व्यक्त केली होती, मात्र पक्षातील कोणीही त्याची दखल घेतली नाही,” असा आरोपही उर्मिला यांनी केला आहे.

मिलिंद देवरा यांना लिहिलेल्या पत्रात उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी कसं त्यांचं काम केलं नाही, त्यांची प्रचारयंत्रणा कशी प्रभावहीन केली, पार्टी फंड पुरेसा नसल्याचं कारण कसं देण्यात आलं, अशा तक्रारींचा मोठा पाढा वाचला होता.

स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांना काम न करायला लावता उर्मिला यांच्या प्रचारात कसे अडथळे आणले, हेही त्यांनी या पत्रात सविस्तर लिहीलं होतं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *