मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात दोन दलित मुलांना जबर मारहाण करुन त्यांची हत्या करण्यात आली आहे. ही दोन मुले पंचायत भवनासमोर शौचालयास बसल्याच्या शुल्लक कारणामुळे जमावाने त्यांना घेरलं. जमावाने मुलांना जबर मारहाण केली,यात दोन्ही मुलांची मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक आर.एस.धाकड यांनी भवेकेडी गावात सकाळच्या वेळी हा प्रकार घडल्याचं सांगितलं आहे.

1. देश के करोड़ों दलितों, पिछड़ों व धार्मिक अल्पसंख्यकों को सरकारी सुविधाओं से काफी वंचित रखने के साथ-साथ उन्हें हर प्रकार की द्वेषपूर्ण जुल्म-ज्यादतियों का शिकार भी बनाया जाता रहा है और ऐसे में मध्य प्रदेश के शिवपूरी में 2 दलित युवकों की नृशंस हत्या अति-दुःखद च अति-निन्दनीय।

— Mayawati (@Mayawati) २५ सप्टेंबर, २०१९

१२ वर्षीय रोशनी आणि १० वर्षीय अविनाश अशी या मुलांची नावे आहेत. घरी शौचालय नसल्याने ही मुले बाहेर शौचालयास गेली होती. जमावाने मुलांना मारहाण केली. मारहाण झाल्यामुळे दोन्ही मुलांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं होतं, पण डॅाक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे असं पोलीस निरक्षिक आर.एस.धाकड यांनी सांगितलं आहे. या प्रकरणी मध्य प्रदेश सरकारवर मायावती यांनी जोरदार टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *