‘एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट’ने ईव्हीएम संदर्भात लोकांशी संवाद साधत सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणात लोकांनी ईव्हीएम बाबतीत आश्चर्यकारक मतं व्यक्त केली आहेत. या सर्वेक्षणात ४८ टक्के नागरिकांना ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असं वाटतं. मात्र, ३७ टक्के लोकांनी ईव्हीएम हॅक होऊ शकते, असं म्हटलं आहे. तर उर्वरित १५ टक्के लोकांना ईव्हीएम कदाचित हॅक होऊ शकते, असं वाटतं.

राजकीय प्रश्नांबरोबरच गेल्या अनेक निवडणूकांपासून चर्चेत असलेल्या ईव्हीएम बाबतचा प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला. त्यामध्ये विविध राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांना देखील हा प्रश्न विचारण्यात आला. यामधील भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपैकी ४० टक्के कार्यकर्त्यांनी देखील ईव्हीएम हॅक होऊ शकते असं म्हटलं आहे. दरम्यान, इतर सर्व पक्षांशी संबंधित असलेल्या ६५ टक्क्यांहून अधिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी ईव्हीएम हॅक होऊ शकते, असं म्हटलं आहे.

या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी ईव्हीएम बाबत आजही शंका उपस्थित केल्या जात असल्याचं समोर आलं आहे. विशेष करून अल्पसंख्याक, दलित आणि ओबीसी वर्गाकडून या शंका अधिक प्रखरतेने उपस्थित होत असल्याचं सर्वेक्षणाचा अभ्यास करणाऱ्या एमआयटीच्या प्राध्यापकांनी सांगितलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *