आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात एका महिला आमदाराला गणेश मंडपात प्रवेश नाकारण्यात आला आहे. वुंदावली श्रीदेवी या वायएसआर काँग्रेसच्या महिला आमदार आहेत. टीडीपी (तेलगू देसम पार्टीच्या) स्थानिक नेत्यांनी, आमदारा गणेश दर्शन घेण्यास मनाई केली. ‘आमदार मागास जातीच्या आहेत त्यांनी जर गणेश पूजेत सहभाग घेतला, तर गणेश अपवित्र होईल’ असं म्हटलं.

आमदार वुंदावली श्रीदेवी यांनी जेव्हा गणेश मंडपात जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा टीडीपीच्या नेत्यांनी धिंगाणा घातला. वुंदावली श्रीदेवी यांना गणेशाचं दर्शन न घेता मागे फिरावं लागलं. त्यानंतर टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये  वाद निर्माण झाले. आमदार वुंदावली श्रीदेवी यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *